E-Paper

राज्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांचा कुलस्वामिनी तुळजाभवानी पावन नागरित आगमन होणार

प्रतिनिधी - रजाक शेख

User Rating: Be the first one !

मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीत आपले मनःपूर्वक स्वागत!

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण धाराशिव जिल्ह्यात येत आहात, यानिमित्ताने आपल्याला एक महत्त्वपूर्ण आठवण करून देऊ इच्छितो.. निवडणुकीच्या प्रचारावेळी आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती.. तसा निर्णयही आपल्या तत्कालीन सरकारने घेतला असल्याचे शब्द तुमचेच होते.. माझ्या धाराशिवसह तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या या शब्दावर विश्वास टाकून आपल्या पदरी भरभरून यश दिले. आता तो शब्द पाळण्याची नैतिक जबाबदारी तुमचीच आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाचा घात न करण्याची जबाबदारी तुमचीच आहे..

आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र दरबारातून आपण संपूर्ण कर्जमाफीची घोषणा तुम्ही आज कराल व आपल्या शब्दाला जागाल, अशी आशा धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना लागून आहे.

शेतकऱ्याविषयी आपले प्रेम खरे असेल तर आपणच केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी करण्यासाठी वाट कसली पाहताय?

ओम राजेनिंबाळकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button