E-Paperमहाराष्ट्र ग्रामीण
ता. तुळजापूर काडगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन परिपत्रक वाटप
उप संपादक : मुस्तकीम घाटवाले, 8605402130

ता. तुळजापूर काडगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन परिपत्रक वाटप करण्यात आले
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन परिपत्रक वाटप करण्याचे कार्यक्रम मा. श्री. सरपंच अशोक दगडू माळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील गावकरी, ग्रामपंचायत चे मेंबर , काडगाव ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वर्ग व पत्रकार बंधू उपस्थित होते.
ही सभा घेत असताना मा.श्री. सरपंच अशोक दगडू माळी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन देत म्हणाले ( ग्रामपंचायत कर्मचारी सोडून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा कमिशन दलाली घेणाऱ्याला तुमची कागदपत्रे देऊ नका ग्रामपंचायत आपले कार्य व्यवस्थितपणे करेल) असे म्हणत त्यांनी या सभेला पूर्णविराम दिला.