E-Paperमहाराष्ट्र ग्रामीण
एसटी बसने घेतला अचानक पेट सुदैवाने 65 प्रवासांचे वाचले प्राण

ही घटना लोहारा तालुक्यातील खेड या परिसरात लोकमंगल कारखान्याजवळ आज शुक्रवारी 8.00 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली.
बस क्रमांक ( MH 20 BL 2092 ) ही बस बसवकल्याण कडून तुळजापूरकडे जात होती माकणी खेड हे स्टॉप झाल्यानंतर बस चालकाने लोकमंगल कारखान्याजवळ प्रवासी उतरण्यासाठी बस थांबवली यावेळी बसच्या इंजन ने अचानक पेट घेतला या बस मध्ये त्यावेळी 65 प्रवासी होते
बस चालक एम, व्ही, घंटे व वाहक बी, एस, गोरे यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले . बस पेटलेली पाहून लोकमंगल कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशामक गाडी ला फोन लावून बोलवून घेतले अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली . सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.