E-Paper

Baba Vanga Predictions : ज्याची भीती होती तेच घडणार; बाबा वेंगांनी सांगितली जगाच्या अंताची तारीख, नवी भविष्यवाणी समोर

दहशतवादी हल्ला 9/11, हिटलरचा मृत्यू अशा अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.

प्रत्येक व्यक्तीला त्याचं भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे? हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. जगात असे अनेक भविष्यवेत्ता आहेत, जे आपल्या भविष्यवाणीमुळे प्रसिद्ध आहेत. जगात असे काही भविष्यवेत्ता आहेत ज्यांच्या भविष्यवाणीवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. अशा भविष्यकारांमध्ये फ्रान्सचा भविष्यवेत्ता नास्त्रोदम आणि बुल्गारियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांचा सर्वात आधी समावेश होतो. नास्त्रेदमने 500 वर्षांपूर्वी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. तसेच बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी देखील खऱ्या ठराल्याचं बोललं जातं.

जगाचा अंत कधी होणार? तो कसा असेल असा प्रश्न अनेकांना पडतो त्याबाबत बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे की जगाच्या अंताला सुरुवात 2025 पासून होईल, युरोपीयन देशांमध्ये एका मोठ्या राजकीय संघर्षाला सुरुवात होईल. 2028 साली मानवांच्या हाती एक मोठा उर्जेचा स्त्रोत लागेल, तसेच 2033 नंतर ध्रुवीय बर्फ वितळण्याची प्रक्रिया प्रचंड गतीमान होऊन समुद्राच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होईल आणि पृथ्वीवर नवं संकट येईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 2170 ला जगभरात भयानक दुष्काळ पडेल तोच जगाचा अंत असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

सूचना : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button