E-Paper
धाराशिव… लोकप्रिय खासदार ओमप्रकाश दादा निंबाळकर दिल्लीत भारताचे कृषिमंत्री श्री.शिवराज सिंह चौहान यांना भेट

आज दिल्ली येथे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमप्रकाशराजे दादा निंबाळकर यांनी देशाचे कृषिमंत्री मा.ना. श्री .शिवराज सिंह चौहान साहेब यांची भेट घेतली
NAFED अंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव जिल्ह्यातील 23009 व औसा आणि निलंगा तालुक्यातील 4506 व बार्शी तालुक्यातील 749 असे
28264 हे शेतकरी सोयाबीन खरेदी पासून अजूनही वंचित आहेत त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होईपर्यंत नाफेड मार्फत होणारी खरेदी ची मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवावी व एकही शेतकरी या खरेदी पासून वंचित राहणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी अशी विनंती केली