E-Paperमहाराष्ट्र ग्रामीण

तुळजापूर तालुक्याचे आमदार मा.श्री. राणा जगजीत सिंह पाटील यांचा जनता दरबार दि-15/06/2025 रोजी काडगाव येथे संपन्न

तुळजापूर तालुक्याचे आमदार मा.श्री. राणा जगजीत सिंह पाटील यांचा जनता दरबार दि-15/06/2025 रोजी काडगाव येथे संपन्न

 

मा.श्री. आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी हे खूप चांगले उपकरण राबवले आहे जनता दरबार च्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक मतदाराचे अडीअडचणी हे आमदार साहेबांपर्यंत पोहोचत नाही म्हणून त्यांनी हे उपकरण राबवले आहे.

तसेच आजचे जनता दरबार काडगाव येथे आयोजित करण्यात आले. गावातील जनता हे आपली समस्या घेऊन जनता दरबार मध्ये उपस्थित होती.

असेच आपली समस्या घेऊन. माझी पत्रकार इस्माईल इन्नुस घाटवाले यांनी यांचे समस्या लेखी स्वरूपात दिले.

त्यांची समस्या असे की इस्माईल इन्नुस घाटवाले यांचे राहते घर जून 2023 मध्ये अतिवृष्टी पावसामुळे पडझड झाली होती . जून 2023 मध्ये ग्रामसेवक ( शंकर कोठे) यांनी पंचनामा करून त्याची पोच इस्माईल इन्नुस घाटवाले यांना दिली .

इस्माईल इन्नुस घाटवाले यांनी ग्रामसेवक व सरपंचाकडे घरकुलाची मागणी केली अद्याप त्यांचे घरकुल हे त्यांच्या पत्नी मुमताज इस्माईल घाटवाले यांच्या नावे घरकुल मंजूर झालेले असून तरी त्यांना घरकुल मिळाले नाही त्यांना असे म्हणण्यात आले ( आपले घरकुल पुढच्या टप्प्यात येईल.) असा पुढचा टप्पा येता येता दोन वर्षे निघून गेली मुमताज इस्माईल घाटवाले यांचा घरकुलचा पुढचा टप्पा ही आला. त्यांनी घराचे बांधकाम सुद्धा पूर्ण केले. (15000) पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता(पैसे) देखील त्यांना मिळाले. परंतु अद्याप घरकुल चा दुसरा हप्ता त्यांना अजूनही मिळाला नाही त्यांचे घर बांधकाम ही पूर्ण आहे. इस्माईल घाट वाले यांच्याकडे त्यांचे घर पडझड झालेले पूर्ण कागदपत्रे पंचनामा केलेली पोच व इतर कागदपत्रे असतानाही त्यांना घरकुलचे पैसे मिळाले नाही.

इस्माईल इनुस घाटवाले यांच्या सोबतच

गावातील शेतकरी मैनुद्दीन हप्पीजुद्दीन मुजावर त्यांची समस्या घेऊन जनता दरबार मध्ये आले मैनुद्दीन हप्पीजुद्दीन मुजावर यांनी त्यांची समस्या व्यासपीठावरील मान्यवरांसमोर मांडली, मैनुद्दीन हप्पीजुद्दीन मुजावर हे त्यांची समस्या स्पष्ट करत म्हणाले (गेल्या दोन वर्षापासून सिंचन विहिरी मिळावी यासाठी मी धडपड करत आहे परंतु मला विहीर मंजुरीसाठी विशिष्ट रकमेची मागणी केल्यामुळ माझी विहीर मंजूर होत नाही) ते म्हणताच तेथे उपस्थित असलेल्या पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मैनुद्दीन हप्पीजुद्दीन मुजावर यांना म्हणाले की (आपले जे काही असेल ते ग्रामपंचायत तीमध्ये जाऊन तक्रार करा येथे गोंधळ करू नका ) असे म्हणून त्यांना व्यासपीठाच्या खाली उतरवताना तेथे गोंधळ होण्याची परिस्थिती निर्माण होत असता तिथे हॅलो इंडिया न्यूजचे उपसंपादक मुस्तकीम इस्माईल घाट वाले हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतात त्यांनाही (तू व्हिडिओ रेकॉर्डिंग का करत आहेस) असे अपशब्द बोलले गेले.

(का हे जनता दरबार फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीच आयोजित केले होते का?) परंतु तेथे उपस्थित असलेले काही समजूतदार नेतेमंडळी मा. वसंतजी वडगावे, अशोक दगडू माळी .कमलाकर पाटील खंडू पावले व इतर कार्यकर्त्यांनी मैनुद्दीन हप्पीजुद्दीन मुजावर आणि इस्माईल इनुस घाटवाले यांची समजूत काढत त्यांना( तुमची समस्या लवकरात लवकर दूर करून तुमचे कार्य  पूर्ण होईल असे आश्वासन दिले.)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button