
नळदुर्ग येथील नगर परिषद कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. या दरम्यान नागरिकांनी थेट आपले प्रश्न मांडले. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या अडचणींचे वेळीच निराकरण व्हावे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.