E-Paper

दहा लकाच नादात डॉक्टरांनी जीवाची कदर नाही केले

R M SHAIKH

User Rating: Be the first one !

भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या.
मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली. अनिशा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते.

अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले. त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र त्यांचा करुण अंत झाला.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या.

सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी..

*माणसाच जीवा पेक्ष्या पैसे मोठा आहे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button