तुळजापूर तालुका काटगाव जि प प्रशाळा येते महात्मा बसवेश्वर यांचा जयंती उत्साहात साजरा करण्यात आला
संपादक - रजाक शेख

आज पी एम श्री जि प प्रशाला काटगाव येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राहुलजी नकाते , प्रहारचे श्री महेशजी माळी यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
नंतर श्री ठोंबरे सर यांनी क्रांतीसूर्य बसवेश्वर महाराज यांच्या जीवनकार्यावरती प्रकाश टाकला . विद्यार्थ्याना त्यांच्या जीवनकार्या विषयी सखोल माहीती सांगण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी प्रशालेतील शिक्षक श्री निपाणीकर , श्री भोसले , श्री कोळी , श्री ढंगे ,श्री अंधारे , श्री निकाळजे , श्री शेख , श्री ठोंबरे , श्रीम. राऊतगोळ , श्रीम बेदरे , श्रीम जाधव , श्रीम राऊत , श्रीम ढगे सामाजिक कार्यकर्ते श्री अण्णाराव रेवगे, श्री विशाल कस्तुरे, श्री निशांत स्वामी, श्री सोमनाथ कोरे, सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण बचाटे,यांची उपस्थिती होती .