E-Paper
राज्यातील लाडकी बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे मिळून पैसे मिळणार
रजाक शेख 🎤📞 7620388807

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केलेली आहे. या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं.