E-Paperमहाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेष
धाराशिव जिल्ह्यात तब्बल 2,274 महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची बातमी समोर येत आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून ग्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. राज्य शासनाने अर्ज भरतांना महिलांना साठी काही निकष निश्चित केले होते. या शासन निर्णय मध्ये सर्व निकष सविस्तरपणे सांगण्यात आले होते.
तरीपण काही महिलांनी निकषा बाहेर जाऊन या योजनेच्या फायदा घेतला असल्याचे समोर आले आहे .
माहितीनुसार मुंबई सह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू आहे, ज्या कुटुंबातील महिलांच्या नावाने चार चाकी कार आहे किंवा ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.अशातच आता अर्ज पडताळणी मध्ये धाराशिव जिल्ह्यातील 2274 महिलांना या योजनेतून वगळण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.