अखंड सहा दशक पवार साहेबांचा संसदीय राजकारणाचे दिशादर्शक शरदवंत महाराष्ट्राची !
संपादक : रजाक शेख 📞 7620388807 हॅलो इंडिया न्यूज चॅनेलला 👆 लाईक करा 🎤

अखंड सहा दशकं पवारसाहेबांच्या संसदीय राजकारणाची, दिशादर्शक शरदवंत महाराष्ट्राची!
आजच्याच दिवशी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी एक शेतकरी कुटुंबातील तरुण तत्कालीन बारामतीसारख्या दुष्काळी भागाचा आमदार झाला. भौगोलिक सह राजकीय परिस्थितीही प्रतिकूलच होती त्यासंघर्षाच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा महाराष्ट्राच्या राजकारणात उदय झाला. आज त्या घटनेला ५८ वर्ष पूर्ण होत आहेत.
एकीकडे स्वातंत्र्यानंतर भारतीयांच्या स्वप्नांना वास्तवाची जाण होत होती तर दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्रानंतर मराठी माणसाने उरी बाळगलेल्या आशा निराशेत बदलते की काय अशी स्थिती असताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक ह्या दिग्गजांच्या साथीने महाराष्ट्रातील सर्वव्यापी विकासाची धुरा हाती घेतली. आणि पुढच्या अवघ्या दहा वर्षातच आदरणीय पवारसाहेबांच्या हाती महाराष्ट्राची सूत्र आली.
उद्योग, शिक्षण, जलसंपदा, सिंचन, शेती, वीज व इतर पायाभूत सुविधा ह्यात विशेष लक्ष देऊन महाराष्ट्र देशात अग्रणी राहील ह्याची काळजी घेतली. महिला धोरणं, फलोत्पादन क्रांती, औद्योगिक विकास, मंडल आयोगाची अंमलबजावणी, सामजिक न्यायाच्या भुमिका अशी धोरणं आणून ‘महाराष्ट्र हा नेहमी देशाला दिशा देतो’ ह्या विचाराला सार्थ ठरवलं.
गेली ५८ वर्ष, आदरणीय पवारसाहेबांच्या संसदीय राजकारणाचा प्रवास एक दिवसाचा खंड न पडता सुरूच आहे. ह्या संपूर्ण प्रवासात अनेक वादळांमध्ये आदरणीय पवारसाहेब सह्याद्रीसम अविचल उभे राहिले, अनेक स्थित्यंतरं आली, संक्रमण आली पण पवारसाहेब महाराष्ट्राला प्रागतिक दिशा देत राहिले. महाराष्ट्राच्या सामाजिक संस्था, साहित्यिक, कलावंत, उद्योगपती, खेळाडू, वैज्ञानिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात पवारसाहेबांनी संस्थाचं मोहोळ उभं केलं.
परवा दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्षपद भूषवताना वैचारीक भिन्नता असलेल्या अनेकांना महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी एकचमंचावर आणण्याची किमयाही आदरणीय पवारसाहेबांनी साधली. ह्यातूनच त्यांनी आजपर्यंत केलेल्या व्यापक राजकारणाची प्रचिती येते.
आज आदरणीय पवार साहेबांचं वय ८४ आहे तरीही लोकांचे प्रश्न सोडविण्याची, त्यांच्यात मिसळण्याची उर्मी तसूभरही कमी झालेली नाही. संसदीय राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर “इतकी उर्जा येते कुठून?” असा हरकतीचा प्रश्न विचारावासा वाटतो. असा हा शरदवंत महाराष्ट्र राज्याच्याभवितव्यासाठी कायम दिशादर्शक असेल इतकं निश्चित!