
बाबळगाव ता, तुळजापूर येथील साठवण तलावा मध्ये आढळले तिघांचे मृतदेह, सोमवारी दुपारी दोन अडीच वाजता हे मूर्त देह निदर्शनास आले,
बाबळगाव ता, तुळजापूर येथील साठवण तलावामध्ये दुपारी दोन अडीचच्या दरम्यान दोन महिला व एक पुरुष यांची मृतदेह आढळले आले
मिळालेल्या माहितीनुसार मूर्तकांचे नाव आयुब नदाफ(वय वर्ष 45 राहणार मुरूम ता, उमरगा),(जया लक्ष्मण कांबळे वय वर्ष 30) (रेश्मा होटगी वय वर्ष 32) त्यांची नावे असून, स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून नळदुर्ग येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी दुचाकीने हे तिघे जात होते अशी माहिती नातेवाईकांकडून मिळालेले आहे
सोलापूर उमरगा महामार्ग चे काम सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली तरी या पुलाचे काम अर्धवट असून बाबळगाव परिसरातील याच पुलावर तीन ते चार महिन्यांपूर्वी एसटी बस पाण्यात पडता पडता वाचली त्या बस मध्ये पन्नास प्रवासी प्रवास करत होते . त्यानंतर ही घटना उघडकीस आली की त्या पुलाला कटडे नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत
तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी व पुढे चालून अशा घटना घडणार नाहीत व याची काळजी घ्यावी.