
ता,तुळजापूर काडगाव मध्ये ग्रामसभा संपन्न झाली
ग्रामसभेमध्ये मा,श्री सरपंच अशोक दगडू माळी व ग्राम विकास अधिकारी श्री कांबळे सर, ग्रामपंचायत सदस्य कृषी अधिकारी व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर, पोलीस पाटील व गावातील गावकरी वर्ग उपस्थित होते.
या ग्रामसभेत गावातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या अडीअडचणी मांडत होता, तरि गावकऱ्यांच्या अडचणी काय होत्या की प्रत्येक शासकीय कामांमध्ये( कमिशन) म्हणजेच दलाली द्यावी लागत आहे तर गावकऱ्यांचे म्हणणे हेच की शासकीय कामासाठी दलाली का द्यावी . कारण की प्रत्येक सरकारी योजना व शासकीय कार्य कोणतेही असो त्यामध्ये दलाली देणे हे साहजिक गोष्ट झालेली आहे. परंतु काही गावकऱ्यांची परिस्थिती ही बिकट आहे त्यामुळे ते दलाली देऊ शकत नाही म्हणून त्यांना खूप काही सरकारी योजना पासून लांब ठेवण्यात येत आहे त्यामध्ये घरकुल असो शासकीय विहीर बांधकाम असो असे बरेच शासकीय कार्य लोकांचे होत नाहीत.
ह्या सर्व अडचणी समजून गावाचे सरपंच श्री अशोक दगडू माळी यांनी सर्वांना मार्गदर्शन करत म्हणाले की( माझ्याकडे काम द्या मी व माझे अधिकारी वर्ग आपले काम करतील परंतु कोणत्याही दलाला जवळ जाऊन विनाकारण पैशाचा नाश करू नये) असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले